Ad will apear here
Next
यवतमाळ साहित्य संमेलनात गाळ्यांसाठी नोंदणी सुरू
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशकांना व पुस्तकविक्रेत्यांना ग्रंथ प्रदर्शनात गाळा मिळण्यासाठीचे अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) कार्यालयात उपलब्ध आहेत.  

हे संमेलन ११, १२ आणि १३ जानेवारी २०१९ या कालावधीत होत आहे. यात होणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनात गाळा अथवा गाळे मिळण्यासाठीचे अर्ज ‘मसाप’च्या कार्यालयात सकाळी नऊ ते दुपारी १२ व सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत उपलब्ध आहेत. गाळे आरक्षणासाठी साडेसहा हजार रुपये नोंदणी शुल्क असून, ही नोंदणी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत रोख शुल्कासह किंवा डीडी (धनाकर्ष) स्वरूपात जमा करायची आहे. गाळ्यांची सोडत २५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत  यवतमाळ येथे संमेलन कार्यालयात काढण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे ज्या साहित्यप्रेमींना संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे आहे. त्यांच्यासाठी तीन हजार रुपये (तीन दिवस निवासाहित भोजन व नाश्ता) प्रतिनिधी शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्या गाळेधारकांना किंवा प्रतिनिधींना नोंदणी करायची असेल त्यांनी ‘मसाप’त दिलेल्या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZSGBU
Similar Posts
डॉ. अरुणा ढेरे यांचा ‘मसाप’तर्फे सत्कार पुणे : यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्मानाने निवड झाल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सत्कार केला.
‘मसाप’त घुमला वामन मल्हार जोशींचा आवाज पुणे : तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र या विषयाचे नामवंत प्राध्यापक... महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सहकारी... विश्ववृत्त मासिकाचे संपादक... रागिणी, आश्रमहरिणी, सुशीलेचा देव, इंदू काळे आणि सरला भोळे या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक... मराठी साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष... १९३० साली मडगाव (गोवा) येथे
‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजहंस’च्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मसाप’तर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. या वर्षी मराठी
‘मसाप’तर्फे ३० जुलै रोजी ‘लेखक तुमच्या भेटीला’ पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन आणि मीरा शिंदे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार दि. ३० जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language